भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मुक्त व्यापार कराराबाबतची चर्चा पूर्ण झाली असून, येत्या ५ वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी या ऐतिहासिक कराराची माहिती दिली.
कराराची महत्त्वाची वैशिष्ट्ये
विनाशुल्क प्रवेश
भारताने निर्यात केलेल्या १००% वस्तूंना न्यूझीलंडमध्ये विनाशुल्क प्रवेश मिळेल, तर न्यूझीलंडच्या ९५% वस्तूंना भारतीय बाजारपेठेत सवलत मिळेल.
२० अब्ज $
पुढील १५ वर्षांत FDI लक्ष्य
२.४ अब्ज $
२०२४-२५ मधील व्यापार
व्हिसा सवलत
भारतीय व्यावसायिकांसाठी न्यूझीलंडचा ३ वर्षांचा तात्पुरता रोजगार प्रवेश व्हिसा मिळेल. याचा फायदा आयुष व्यावसायिक, योग प्रशिक्षक, आयटी इंजिनिअर्स आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना होईल.
फायदा होणारी क्षेत्रे
भारतातील कापड उद्योग, चामडे, दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि सागरी उत्पादने यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच कोळसा आणि लाकडी वस्तू स्वस्त मिळण्यास मदत होईल.
संरक्षित वस्तू (कराराबाहेर)
स्थानिक शेतकरी आणि MSME च्या हितासाठी खालील वस्तू करारातून बाहेर आहेत:
दूध क्रीम दही चीज
कांदा हरभरा मटार मका
बदाम साखर तांबे ॲल्युमिनियम
* रत्ने-दागिने यांच्या काही विशिष्ट वस्तू देखील समाविष्ट आहेत.